येळदरीजवळ बिळूरचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:36+5:302021-06-02T04:21:36+5:30

संख : येळदरी (ता. जत) येेेथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला. रवी आकाराम चव्हाण ...

Bilur youth killed near Yeldari | येळदरीजवळ बिळूरचा युवक ठार

येळदरीजवळ बिळूरचा युवक ठार

संख : येळदरी (ता. जत) येेेथे दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला. रवी आकाराम चव्हाण (वय ३५, रा. बिळूर, ता. जत) असे त्याचे नाव आहे. अपघातात दोघे जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्वजण बिळूूूर गावचे आहेत. सांंगली व जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, रवी चव्हाण व त्याचा मित्र भैरु श्रीमंत जावीर जतहून बिळूरला दुचाकीने (एमएच ०९ डीएच २५) चालले होते, तर प्रवीण गुरुबसू कोट्टलगी हा आई भारती यांना घेऊन विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून बिळूरहून जतला निघाला होता.

दोन्ही दुचाकी येळदरीलगत आल्यावर समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही गाड्या वेगात असल्याने सर्वजण उडून रस्त्यावर पडले. त्यामध्ये रवी चव्हाणच्या डोक्याला मार लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रवीण कोट्टलगी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सांगलीत उपचार सुरू आहेत. भारती कोट्टलगी यांच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भैरु जावीर किरकोळ जखमी झाला आहे.

Web Title: Bilur youth killed near Yeldari