शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: मारहाण केल्याच्या रागातून साथीदाराने काढला काटा; जुनी धामणीत बिहारी कामगाराचा गळा चिरून खून

By घनशाम नवाथे | Updated: April 1, 2026 17:51 IST

खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

सांगली : पूर्वीच्या मारहाणीचा राग मनात धरून विनायक कुमार बालेश्वर चौधरी (वय २२, मूळ रा. जखरा वॉर्ड क्र. २, चंपारण, बिहार, सध्या रा. जुनी धामणी) या कामगाराचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला. याबाबत त्याचा साथीदार संशयित सोनू कुमार नाथूसहानी (वय २१, रा. तेलुहा वॉर्ड ०२, पश्चिम चंपारण, बिहार) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील आलास (ता. शिरोळ) येथे स्मशानभूमीच्या घाटाचे काम सुरू असताना किरकोळ कारणातून मृत विनायक कुमार आणि संशयित सोनु कुमार यांच्यात वाद झाला. तेव्हा विनायकने त्याला मारहाण केली. तेव्हा सोनूने त्याला ‘तुने मुझे मारकर बहुत गलती की, तुझे देख लुंगा’ अशी धमकी दिली होती. तेव्हा इतर साथीदारांनी त्यांच्यातील वादावर पडदा टाकला होता. परंतू सोनूच्या मनात हा राग धुमसत होता. विनायकने सोनुचा मित्र अंगद कुमारचा लहान भाऊ भीम याला दारूचे व्यसन लावल्यामुळे त्याच्या रागात आणखी भर पडली होती. या कारणावरून त्यांच्यात कुरबुर सुरूच होती.आलास येथील कामानंतर काही दिवसापासून जुनी धामणी येथील स्मशानभूमीजवळ घाटाचे काम सुरू होते. त्यामुळे मुकादम नागेंद्र चौधरी याने सर्व कामगारांना जुनी धामणी येथे आणले होते. घाटापासून काही अंतरावर पत्र्याच्या शेडमध्ये सर्वजण राहत होते. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास मुकादम आणि कामगार जेवण बनवत होते. तेव्हा विनायक आणि सोनू हे दोघेजण घाटाकडे गेले होते. तेव्हा नशेत दोघांमध्ये वाद झाला. सोनूने धारदार शस्त्राने विनायकचा गळा चिरला. त्यामुळे त्याचा तडफडून रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर सोनूने आणखी एक कामगार मिथुन कुमार याला बोलवून रात्री साडे दहाच्या सुमारास घाटाकडे नेले. तेथे गेल्यानंतर मृतावस्थेत पडलेला विनायक त्याला दाखवला. ‘मैने विनायक का गला काट दिया है, आपण दोनो इसको नदी मे फेक देंगे’ असा म्हणाला. परंतू मिथूनने त्याला नकार दिला. तो तेथून निघाला. तेव्हा सोनुने त्याला ‘किसीको मत बताना, नही तो तुझे भी मार दुंगा’ अशी धमकी दिली. मिथुनने हा प्रकार मुकादम नागेंद्रला सांगितला. तेव्हा नागेंद्रने सेंट्रींग कंत्राटदार सुशांत सुभाष बुरंगे (रा. बोरगाव, ता. वाळवा) यांना हा प्रकार कळवला. बुरंगे यांनी रात्री साडे अकरा वाजता जुनी धामणी येथे येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना विनायकचा खून झाल्याचे दिसले.दरम्यान सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ पंचनामा केला. त्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवून सोनुला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली आहे. कंत्राटदार सुशांत बुरंगे यांची फिर्याद नोंदवली आहे.

खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नमंगळवारी रात्री दारूच्या नशेत विनायक आणि सोनू यांच्यात वाद उफाळून आला. तेव्हा सोनूने धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून टाकला. खुनानंतर मृतदेह नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. परंतू कामगार मिथून याने नकार देत मुकादमास हा प्रकार कळवला. त्यामुळे खून झाल्याचे निदर्शनास आले.

महिन्यापूर्वी झाला होता वादकोल्हापूर जिल्ह्यातील आलास येथे महिन्यापूर्वी कामाच्या ठिकाणी विनायक आणि सोनू यांच्यात वाद झाला होता. विनायकने मारहाण केल्यामुळे महिन्यापासून सोनूच्या मनात राग धुमसत होता असे तपासात स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Old grudge leads to Bihari worker's murder.

Web Summary : In Sangli, a Bihari worker was murdered due to an old dispute. The accused, a fellow worker, slit his throat after a previous quarrel and threats. Police have arrested the suspect.