शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: डाळिंबावर बिब्या रोगाचा प्रादुर्भाव; ढगाळ वातावरण, रिमझिम पावसाचा परिणाम

By श्रीनिवास नागे | Updated: July 25, 2023 16:06 IST

दरीबडची (जि. सांगली ) : ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या, फळकुज रोगांचा प्रादुर्भाव ...

दरीबडची (जि. सांगली) : ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे जत तालुक्यातील डाळिंबांवर बिब्या, फळकुज रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करीत शेततलाव व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डाळिंबाच्या बागा उभ्या केल्या आहेत. डाळिंबाचे क्षेत्र १५ हजार ३४४.५९ एकर आहे. केशर वाणाच्या बागा अधिक आहेत. संख, दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, सिध्दनाथ, आसंगी (जत) दरीकोणूर, वाळेखिंडी, काशीलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे. शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन बागा वाचविल्या आहेत.आता मान्सून पाऊस, ढगाळ व प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला आहे. फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळाचे ढीग लागले आहेत. उत्पादनात घट होणार आहे.बागा वाचवण्याची धडपड सुरु आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी महागड्या औषधांचा मारा करत आहेत. मात्र कशाचाही उपयोग होत नाही हे लक्षात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी बागा सोडून दिल्या जात आहेत. लाखो रुपयांचा फटका बसला आहे.विकास सोसायट्या संकटाततालुक्यातील विकास सोसायट्यांनी बागांवर कोट्यवधीच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा अडचणीत आल्याने लाखो रुपयांची येणेबाकी असल्याने विकास सोसयट्या अडचणीत येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीweatherहवामान