शिरटे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:23 IST2021-03-22T04:23:43+5:302021-03-22T04:23:43+5:30

शिरटे (ता. वाळवा) येथे दिलीपराव देसाई यांच्या हस्ते प्रतीक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल पवार, विजया पोळ, ...

Bhumipujan of various development works at Shirte | शिरटे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

शिरटे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

शिरटे (ता. वाळवा) येथे दिलीपराव देसाई यांच्या हस्ते प्रतीक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल पवार, विजया पोळ, पृथ्वीराज पाटील, पंढरीनाथ पाटील, रणजित लाड उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरटे : शिरटे (ता. वाळवा) येथे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य धनाजी बिरमुळे, पंचायत समिती सदस्या विजया पोळ उपस्थित होत्या.

प्रतीक पाटील यांची जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिरटे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने बाजार समितीचे संचालक दिलीपराव देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा बँकेचे संचालक रणजित लाड, सरपंच शैलजा पाटील, उपसरपंच अरुण देसाई, पै. पृथ्वीराज पाटील, पंढरीनाथ पाटील, सुनील पोळ, स्वाती काकडे, विलास पाटील, परशराम देसाई, विशाल पवार, प्रशांत देसाई, प्रशांत रणदिवे, उद्योजक अनिल पाटील, डॉ. शेखर देसाई, दत्तात्रय सावंत, अमर देसाई, प्रणित पाटील, यशवंत देसाई उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of various development works at Shirte