नागराळेत १० लाखांच्या कामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:27 IST2021-05-21T04:27:29+5:302021-05-21T04:27:29+5:30

पलूस : नागराळे (ता. पलूस) गावामध्ये जनसुविधा योजनेंतर्गत दहा लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदार अरुण लाड यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार ...

Bhumi Pujan of 10 lakh works in Nagarale | नागराळेत १० लाखांच्या कामाचे भूमिपूजन

नागराळेत १० लाखांच्या कामाचे भूमिपूजन

पलूस : नागराळे (ता. पलूस) गावामध्ये जनसुविधा योजनेंतर्गत दहा लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदार अरुण लाड यांच्याहस्ते झाले.

यावेळी आमदार लाड म्हणाले, नगराळे गावाची तालुक्यात एक वेगळीच ओळख आहे. या गावच्या विकासासाठी हवा तेवढा निधी देण्यात येईल. सार्वजनिक उपक्रम गावाने हाती घ्यावेत, तसा प्रस्ताव करून सादर केल्यास त्याला तात्काळ निधी देण्यात येईल. कुठेही निधीची अडचण तुम्हाला जाणवणार नाही.

यावेळी नागराळे गावच्या सरपंच वनिता पाटील, उपसरपंच इंद्रजित पवार, व्ही. वाय. पाटील, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, धर्मवीर गायकवाड, ॲड. सूर्यजित चव्हाण, यशवंत बाबर, डी. एन्. पवार, नंदाताई पाटील, शांताबाई दिंडे, अपर्णा मस्के, संगीता सिध्द, अमित जाधव, अनिता जाधव, सुरेखा मुळीक, कैलास पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Bhumi Pujan of 10 lakh works in Nagarale