हरभरा पीक स्पर्धेत भाऊसाहेब पाटील यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:16+5:302021-07-05T04:17:16+5:30
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रब्बी हंगामात गहू व हरभरा पीक स्पर्धा घेण्यात आली. ...

हरभरा पीक स्पर्धेत भाऊसाहेब पाटील यांचे यश
नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत रब्बी हंगामात गहू व हरभरा पीक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये येथील शेतकरी भाऊसाहेब विलास पाटील यांनी हरभरा पीक स्पर्धेत हेक्टरी ४५ क्विंटल १० किलो उत्पादन घेऊन कोल्हापूर विभागात तृतीय क्रमांक मिळवला, तर पोपट रामचंद्र माळी यांनी गहू पीक स्पर्धेत भाग घेऊन हेक्टरी ५७ क्विंटल उत्पादन घेऊन तालुक्यात तृतीय क्रमांक मिळाला. भाऊसाहेब पाटील यांचा जिल्हा परिषदेतर्फे अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना तालुका कृषी अधिकारी भगवान माने, मंडल कृषी अधिकारी दिलीप बामणे, पर्यवेक्षक डी. व्ही. पाटील, कृषी सहायक साधना अहिरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
फोटो : ०४ नेर्ले १
ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथील शेतकरी भाऊसाहेब पाटील यांचा हरबरा पीक स्पर्धेत कोल्हापूर विभागात तृतीय क्रमांक आल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साधना अहिरे उपस्थित हाेत्या.