भाळवणीत एकास बेदम मारहाण

By Admin | Updated: January 31, 2016 00:47 IST2016-01-31T00:31:32+5:302016-01-31T00:47:44+5:30

दहाजणांवर गुन्हा : हल्लेखोर तडसरचे

At Bhalavani, one breathless assault | भाळवणीत एकास बेदम मारहाण

भाळवणीत एकास बेदम मारहाण

विटा : विहिरीवरील विद्युत पंप का देत नाहीस, तसेच जमिनीची नोंद का थांबविली आहेस, असा जाब विचारून चुलते राजू गुलाब गडकरी यांना विळ्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना भाळवणी (ता. खानापूर) येथे शनिवारी सकाळी घडली. या हल्ल्यात राजू यांची पत्नी सौ. शाहीन यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
भाळवणी येथील राजू गडकरी व चॉँद गडकरी या चुलते-पुतण्यात विद्युत पंप व जमिनीच्या नोंदीवरून वाद आहे. शनिवारी पुतण्या चॉँद याने चुलते राजू यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चॉँद याचा तडसर येथील मेहुणा व अज्ञात आठजण घटनास्थळी आले. त्यावेळी मेहुण्याने चॉँद याला विहिरीवरील विद्युत पंप का देत नाहीस व जमिनीची नोंद का थांबविली आहेस, असे विचारून राजू यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुतण्या चॉँद याने त्याच्या हातातील धारदार विळ्याने चुलते राजू यांच्या डोक्यात वार केला.
या हल्ल्यात राजू गडकरी गंभीर जखमी झाले. त्यावेळी त्यांची पत्नी सौ. शाहीन या भांडण सोडविण्यास गेल्यानंतर त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्लयातील गंभीर जखमी राजू यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: At Bhalavani, one breathless assault