बाबासाहेब देशमुख महाविद्यालयास सर्वाेत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:30+5:302021-01-25T04:28:30+5:30

ते म्हणाले, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रा. डॉ. धनंजय नाथा लोहार यांना जाहीर झाला आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत केवळ देशमुख ...

Best College Award to Babasaheb Deshmukh College | बाबासाहेब देशमुख महाविद्यालयास सर्वाेत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

बाबासाहेब देशमुख महाविद्यालयास सर्वाेत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

ते म्हणाले, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रा. डॉ. धनंजय नाथा लोहार यांना जाहीर झाला आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत केवळ देशमुख महाविद्यालयांची सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

देशमुख म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सन २०१९–२०मध्ये नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या नि:स्वार्थ सेवेचा यशोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयमार्फत राष्ट्रीय सेवा योजना चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्याचबरोबर समाजोपयोगी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर इतर ज्ञान देण्याचे काम सुरू असून, या गौरवाने प्रोत्साहन मिळण्यास चालना मिळेल.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विजय लोंढे, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष कारंडे, सहसचिव एच.यू. पवार, प्राचार्य विजय लोंढे, प्रा.विजय शिंदे, प्रा. दादासाहेब काळे उपस्थित होते.

फोटो- अमरसिंह देशमुख यांचा फोटो घेणे

Web Title: Best College Award to Babasaheb Deshmukh College