शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पैशाच्या वादातून बेणापूरच्या तरुणाचे भरदिवसा खानापुरातून अपहरण, दोघा संशयितांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 13:24 IST

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली

विटा : उसने पैशाच्या देवाणघेवाणीवरून खानापूर तालुक्यातील विठ्ठलनगर (बेणापूर) येथील उदय आनंदराव भोसले (वय ३८) या तरुणाचे खानापूर येथून भरदिवसा अपहरण करण्यात आले. ही घटना गुरुवार, दि. १ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी गब्बर ऊर्फ प्रताप ज्ञानू करचे (रा. पाचेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) व अन्य एक अनोळखी, अशा दोघांविरुद्ध विटा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उदय भोसले हा तरुण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून व्यावसायानिमित्त परराज्यात आहे. उदय यांनी पाचेगाव येथील गब्बर ऊर्फ प्रताप करचे याच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. ते त्यांनी अद्याप परत केले नव्हते. त्यामुळे उदय हे गेल्या महिन्यात गावी विठ्ठलनगर येथे आल्यानंतर संशयित गब्बर याने त्या तरुणाची भेट घेऊन पैसे देण्याची मागणी केली होती.त्यावेळी या दोघांत बोलणी होऊन पैसे देण्या-घेण्याबाबत निर्णय झाला होता. त्यानंतर उदय भोसले हे परत परराज्यात गेले. दि. ३० नोव्हेंबर रोजी भोसले हे गावी विठ्ठलनगर येथे आले होते. गुरुवारी उदय हे खानापूरला गेल्यानंतर यश कॉम्प्युटर दुकानासमोर थांबले असताना गब्बर ऊर्फ प्रताप करचे व त्याचा साथीदार दुचाकी घेऊन त्याठिकाणी आले.त्यावेळी या दोघांनी पती उदय यांना दुचाकीवर बसवून त्याला पळवून नेल्याबाबतची तक्रार त्यांची पत्नी छाया भोसले यांनी गुुरुवारी विटा पोलिसांत दिली. उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस