कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील कोरोना विलगीकरण कक्षात युवा नेते प्रतीक पाटील यांनी दिलेल्या कोरोगेटेड बेड स्वीकारताना कार्यकर्ते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने नानासाहेब महाडिक विद्यालयात विलिनीकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी युवा नेते प्रतीक पाटील यांनी मोफत बेड दिले आहेत. रविवारी ते ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढू लागल्याने गावात विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. ग्रामपंचायतीच्यावतीने नानासाहेब महाडिक विद्यालयात विलीनीकरण कक्षास मदतीसाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पुढे येत आहेत. त्यांनी रुग्णांची चांगली सोय व्हावी व ते लवकरात लवकर बरे व्हावे या उद्देशाने नियोजन केले आहे. युवा नेते प्रतीक पाटील यांनीही बेडच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला मदत केली आहे.