आंबे काढायला विरोध केल्याने काठीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:24 IST2021-05-15T04:24:42+5:302021-05-15T04:24:42+5:30

सांगली : झाडावरचे आंबे काढण्यास विरोध केला म्हणून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल ...

Beaten with a stick for resisting the removal of mangoes | आंबे काढायला विरोध केल्याने काठीने मारहाण

आंबे काढायला विरोध केल्याने काठीने मारहाण

सांगली : झाडावरचे आंबे काढण्यास विरोध केला म्हणून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले.

स्नेहा तानाजी खोकडे (वय २४, रा. सुभाषनगर, आकाशवाणीमागे, सांगली) यांच्या फिर्यादीनुसार आशा मधुकर पाटील, सरिता राहुल पाटील, निखील नितीन पाटील, राहुल मधुकर पाटील व नीता नितीन पाटील (सर्व रा. आकाशवाणीमागे, सांगली) यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. दुसऱ्या कुटुंबातील निखील पाटील (वय २९) यांच्या फिर्यादीनुसार विपूल तानाजी खोकडे, तानाजी खोकडे, स्नेहा तानाजी खोकडे व विपूल याची आई (सर्व रा. सुभाषनगर, आकाशवाणीमागे, सांगली) अशा चौघांवर गुन्हे दाखल झाले.

गुरुवारी (दि.१३) दुपारी सव्वाचार वाजता हाणामारी झाली. स्नेहा खोकडे यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या अंगणातील झाडाचे आंबे पाटील परिवारातील सदस्य काढत होते. त्याला विरोध केल्याने पाटील कुटुंबाने काठीने हल्ला केला. शिवीगाळ केली. हाणामारी सोडविण्यासाठी गेलेली आशा मधुकर पाटील ही वृद्धादेखील जखमी झाली. नखील पाटील यांच्या तक्रारीनुसार ते स्वत:च्या झाडावरील आंबे काढत होते.

Web Title: Beaten with a stick for resisting the removal of mangoes