ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी परतल्या; भाषाही येत नव्हती, संस्थेत घेतला होता आश्रय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:12 IST2025-12-11T12:11:26+5:302025-12-11T12:12:32+5:30
७३ वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव यांना ओडिशातून सांगलीत आणले आणि तिथून बार्शी येथील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्यापर्यंतच्या प्रवासात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जबाबदारी पार पाडली.

ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी परतल्या; भाषाही येत नव्हती, संस्थेत घेतला होता आश्रय
सांगली : जिल्हा परिषद प्रशासनाने एका हरवलेल्या आजीला ओडिशातून तिच्या कुटुंबाकडे परत आणून मानवतेचा उच्चतम नमुना सादर केला. ही घटना संवेदनशील समन्वय आणि प्रामाणिक सहकार्याची अनमोल कहाणी आहे.
७३ वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव यांना ओडिशातून सांगलीत आणले आणि तिथून बार्शी येथील त्यांच्या कुटुंबीयांची भेट घालून देण्यापर्यंतच्या प्रवासात सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जबाबदारी पार पाडली.
लैंगिक हिंसेमुळे १ अब्ज व्यक्तींचे बालपण अन् तारुण्यही कोमेजलेलेच
प्रशासनाचा सुंदर दाखला देणारी कहाणी
ओडिशापासून सांगलीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे फक्त अंतराचा नव्हे, तर तो माणुसकीचा, सहकार्याचा आणि आशेचा पूल आहे. म्हणूनच सांगलीत परतल्यानंतर विजयाबाई यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत होते.
जिल्हाधिकारी परभणीचे म्हणून...
विजयाबाई दीड वर्षापूर्वी कुर्डूवाडी येथून हरवल्यानंतर त्या ओडिशा राज्यातील झारसगुडा येथे सापडल्या. या अशिक्षित वृद्ध आजीची आठवण व ओळख फक्त नावापुरतीच होती; इतर माहिती विसरून गेल्या होत्या. भाषेचे बंधनही तिथल्या परिस्थितीला वेगळाच अडथळा होता.
ओडिशा येथील ‘विकाश’ या संस्थेच्या सहकार्याने त्यांना सुरक्षित आश्रय मिळाला. मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने झारसगुडा जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण (मूळचे परभणी) यांनी आजीला पाहताच तिच्या स्थितीची माहिती घेतली. नरवाडे यांच्याशी तत्काळ संपर्क साधला.
नरवाडे यांनी आजीला ओडिशातून सांगलीपर्यंत परत आणले. विकाश संस्थेच्या सहकार्याने ८ डिसेंबर रोजी सुरू झालेला प्रवास छत्तीसगड, गोंदियामार्गे सांगलीपर्यंत यशस्वी झाला.