झीरो पेमेंट नसणाऱ्या व्यापाऱ्यांना सौदेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:07 IST2020-12-05T05:07:37+5:302020-12-05T05:07:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बेदाण्याचे सौदे शुक्रवारपासून (दि. ४) सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. झीरो ...

Bargaining for traders who do not have zero payment | झीरो पेमेंट नसणाऱ्या व्यापाऱ्यांना सौदेबंदी

झीरो पेमेंट नसणाऱ्या व्यापाऱ्यांना सौदेबंदी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : बेदाण्याचे सौदे शुक्रवारपासून (दि. ४) सुरू होत असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. झीरो पेमेंटसाठी दिवाळीपूर्वीपासून ते बंद होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजता कोरोनाचे नियम पाळून पुन्हा सुरू होतील, अशी माहिती बाजार समिती सचिवांनी दिली. दरम्यान, झीरो पेमेंट न केलेल्या व्यापाऱ्यांना सौद्यांसाठी परवानगी देणार नाही, असा बेदाणा असोसिएशनच्या बैठकीत रात्री उशिरा निर्णय झाला.

बाजार समितीचे सचिव आर. ए. पाटील यांनी सांगितले की, दुपारी बारा वाजता एक्स्ट्रा बेदाण्याचे सौदे होतील. त्यानंतर एक वाजल्यापासून नियमित सौदे होतील. अडते, खरेदीदार व व्यापाऱ्यांनी सौद्यावेळी उपस्थित रहावे. दरम्यान, झीरो पेमेंटसंदर्भात अंतिम निर्णयासाठी बेदाणा असोसिएशनची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार व सचिव राजेंद्र माळी यांच्यासह संचालक उपस्थित होते. बेदाण्याचे पैसे थकीत ठेवलेल्या व्यापाऱ्यांना सौद्यामध्ये निर्बंधाविषयी चर्चा अपेक्षित होती. सुमारे सहा व्यापाऱ्यांनी पैसे थकविले आहेत. त्यांच्यावर निर्बंधाविषयी उशिरापर्यंत चर्चा झाली. काही व्यापाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांत पैसे चुकते केले आहे. त्यातून राहिलेल्या व्यापाऱ्यांना सोमवारपर्यंतची वेळ देण्याचे ठरले. मात्र त्यांना शुक्रवारच्या सौद्यात भाग घेता येणार नाही, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.

Web Title: Bargaining for traders who do not have zero payment