शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा तुमची कार्यालये पेटवू, रघुनाथदादा पाटील यांचा बँकांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:43 IST

कर्जमाफी इशाऱ्यासाठी २ एप्रिलला मोर्चा

सांगली : भाजपप्रणीत सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफीचा शब्द दिला होता. म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेत बसविले असल्यामुळे त्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल महिन्यात येणार आहे. तोपर्यंत जिल्हा बँकेसह सर्वच बँका, सोसायट्या, पतसंस्थांनी कर्ज वसुली थांबवावी. जबरदस्ती केल्यास बँकांची कार्यालये पेटवून देऊ, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला.पाटील म्हणाले, शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून १९ मार्च २०२५ महाराष्ट्रातील सरकारच्या धोरणाचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांच्या स्मृती दिवसापर्यंत कर्जमुक्ती जनजागरण अभियानाचा महाराष्ट्रभर प्रचार झाला. समारोप सभा कृषी आयुक्त, सहकार आयुक्त यांच्या दारात सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे झाले. १९ मार्चच्या धरणे आंदोलनानंतर लगेच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यासंदर्भात दि. २१ मार्च रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. कर्जमुक्तीसाठी संघटनेने केलेल्या आंदोलनाचे हे फलित आहे. एकीकडे समिती स्थापन केलेली असताना शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी जप्तीच्या कारवाई होत आहे. शासनाच्या कर्जमाफीचा निर्णय होईपर्यंत बँका, पतसंस्था आणि सोसायट्यांनी कर्ज वसुली थांबवावी. एवढे करूनही बँका, पतसंस्था, सोसायट्यांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने सोसायट्यांची कार्यालये पेटवून देऊ, बँकांना टाळे ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.

कर्जमाफी इशाऱ्यासाठी २ एप्रिलला मोर्चाशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सक्तीच्या वसुली, बँक खाती सील, जप्ती, पोलिस बळ आणि जमीनदारांना त्रास देणे सुरू आहे, ते थांबविण्याच्या मागणीसाठी दि. २ एप्रिलला शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले.

शेतीमाल निर्यातीवरील निर्बंध उठवाकेंद्र आणि राज्य सरकारने शेतीमालावर कोणतेच निर्बंध लादू नयेत, शेतकरी तुम्हाला कर्जमाफी मागायलाही येणार नाही. पण, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाचे दर कमी होत आहेत. म्हणूनच शेतकरी कर्जबाजारी होत असल्यामुळेच १०० टक्के कर्जमाफी झाली पाहिजे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे, असेही रघुनाथदादा म्हणाले. तसेच दोन साखर कारखान्यांतील अंतराची अटही रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीbankबँक