शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली प्रदूषण नियंत्रण मंडळाला टाळे ठोकू; पृथ्वीराज पवार, सतीश साखळकरांचा इशारा 

By शीतल पाटील | Updated: April 5, 2023 19:33 IST

'कृष्णा नदीत थेट पाणी सोडणारे साखर कारखाने, डिस्टिलरी, दूध संघ, नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका सगळे दोषी आहेत. हरित लवादाच्या अहवालानुसार कारवाई अपेक्षित'

सांगली : प्रदूषण नियंत्रण मंडळ राजकीय दबावाखाली काम करणार असेल तर कृष्णा नदीचेप्रदूषण रोखणे अशक्य आहे. नदी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कार्यवाही सुरू करा. केवळ कागदी घोडे नाचवायचे असतील तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकावे लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार आणि नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी बुधवारी दिला.कृष्णा नदी प्रदूषणाबाबत उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, आनंद देसाई उपस्थित होते.सांगलीकर रस्त्यावर उतरले, हजारो लोकांनी मानवी साखळी केली. त्यानंतरही केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. नदी प्रदूषणावर जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याशी स्वतंत्र बैठक घेऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पृथ्वीराज पवार म्हणाले, कृष्णा नदीत थेट पाणी सोडणारे साखर कारखाने, डिस्टिलरी, दूध संघ, नगरपालिका, ग्रामपंचायती, महापालिका सगळे दोषी आहेत. हरित लवादाच्या अहवालानुसार कारवाई अपेक्षित आहे. राजकीय दबावातून कृष्णा नदीची वाट लागत आहे. कारवाईत हलगर्जीपणा नको; अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय बंद करावे लागेल.सतीश साखळकर म्हणाले, नदी प्रदूषणावर विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी झाली. हरित लवाद समितीचा अहवाल पटलावर ठेवला. मंत्रालयात बैठका झाल्या; मात्र कृती कार्यक्रम नेमका काय, याचे उत्तर कोणत्याच यंत्रणेकडे नाही. ज्या संस्था चोरून नदीत सांडपाणी सोडत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करा. शहरे व गावांतील सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी आम्ही दबाव वाढवू, प्रसंगी मोठे आंदोलन उभे करू.

कायदेशीर कारवाई सुरूनदी प्रदूषणाबाबत सरकार गंभीर असून, लवकरच मार्गदर्शक सूचना हाती येतील. प्रदूषण करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. जे दोषी सापडतील त्यांचे अहवाल आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करीत आहोत, त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, असे अवताडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangliसांगलीriverनदीpollutionप्रदूषणBJPभाजपा