शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ‘स्वाभिमानी’च्या दणक्याने उपसाबंदी आदेश मागे, उद्यापासून कृष्णा नदीतून पाणी उपसा  

By अशोक डोंबाळे | Updated: June 24, 2023 17:30 IST

सांगलीत पाटबंधारे कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन

सांगली : कोयना धरणात १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सोमवार दि. २६ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश दिला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पिके वाळू लागल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी सांगलीत पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन केले. तसेच अधिकाऱ्यांना यापुढे असा मनमानी कारभार खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कृष्णा नदीतीलपाणी उपसा बंदी आदेश रविवार दि. २५ जूनपासून मागे घेतला आहे.सांगली येथील पाटबंधारे कार्यालयासमोर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शनिवारी शंखध्वनी आंदोलन केले. कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. अधिकारी आणि सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. उपसाबंदी मागे घेतली नाही तर पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.शेवटी राजू शेट्टी यांनी जलसंपदाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून तोडगा काढला. यावेळी उपविभागीय अभयिंता मोहन गळंगे उपस्थित होते. त्यानंतर कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी उपसाबंदी आदेश मागे घेत असल्याचे पत्र आंदोलकांना दिले. कृष्णा नदीतून रविवार दि. २५ जूनपासून पाणी उपसा चालू होणार आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही कृष्णा नदीकाठच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेशही देवकर यांनी दिले आहेत. या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.आंदोलनात महेश खराडे, भागवत जाधव, पोपट मोरे, संदीप राजोबा, प्रकाश देसाई, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शिवाजी पाटील, शंकर पाटील, उत्तम पाटील, योगेश पाटील, यशवंत गायकवाड, दिगंबर देसाई, अशोक काकडे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

साताऱ्यात पाणी उपसा, सांगलीतच बंदी का? : राजू शेट्टीपाण्याची टंचाई आहे, याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात उपसाबंदी आणि सातारा जिल्ह्यात उपसा सुरू आहे, हा दुजाभाव नको, सरसकट सर्वांना एकच नियम लागू करण्याची गरज आहे. सांगली जिल्ह्याला एक न्याय आणि सातारा जिल्ह्याला एक न्याय हे खपवून घेणार नाही. प्रशासनाने भेदभावाचे धोरण राबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना