आष्टा दक्षिण भाग सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी बाबासाहेब शेळके, रवी कुपाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:24 IST2021-04-14T04:24:22+5:302021-04-14T04:24:22+5:30

आष्टा : आष्टा येथील आष्टा दक्षिण भाग विकास सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी बाबासाहेब शेळके व रवी कुपाडे यांची बिनविरोध निवड ...

Babasaheb Shelke, Ravi Kupade as the Approved Director of Ashta Dakshin Bhag Society | आष्टा दक्षिण भाग सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी बाबासाहेब शेळके, रवी कुपाडे

आष्टा दक्षिण भाग सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी बाबासाहेब शेळके, रवी कुपाडे

आष्टा : आष्टा येथील आष्टा दक्षिण भाग विकास सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी बाबासाहेब शेळके व रवी कुपाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन संचालक बाबासाहेब शेळके व रवी कुपाडे यांचा अध्यक्ष बाळाबाई जगन्नाथ मस्के, उपाध्यक्ष ईलाई कासम संदे, मोहन गायकवाड, शिवाजीराव ढोले, तानाजी सूर्यवंशी, जगन्नाथ मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सभासद सुनील माने यांना महाराष्ट्र शासनाचा ‘कृषिभूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी संचालक मंडळाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचे आश्वासन दिले. यावेळी आनंदराव यादव-पाटील, राजाराम ढोले, पोपट शेळके, आनंदा खोत, बाबासाहेब नायकवडी, आनंदराव आटुगडे, सुरेंद्र आटुगडे, मारुती माने, संस्थेचे सचिव अरुण खोत यांच्यासह संचालक उपस्थित होते. अरुण खोत यांनी आभार मानले.

फोटो : १३ आष्टा १

ओळ : आष्टा येथे बाबासाहेब शेळके व रवी कुपाडे यांचा मोहन गायकवाड, शिवाजीराव ढोले, तानाजी सूर्यवंशी, जगन्नाथ मस्के, इलाई संदे, पोपट शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Babasaheb Shelke, Ravi Kupade as the Approved Director of Ashta Dakshin Bhag Society