बाबासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:12+5:302021-07-27T04:28:12+5:30
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ सामाजसेवक बाबासाहेब कृष्णाजी नलवडे-पाटील (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ...

बाबासाहेब पाटील
वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ सामाजसेवक बाबासाहेब कृष्णाजी नलवडे-पाटील (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते वाटेश्वर कन्या शाळा मुख्याध्यापक बिपीन पाटील, उद्योजक नितीन पाटील यांचे वडील, तर प्राजंली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राहुल पाटील यांचे ते चुलते होत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार मंडळ पुणेचे माजी मानद सचिव, वाटेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष, माजी उपसरपंच, क्रांतिवीर बर्डे गुरुजी विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष, संजय बने मेमोरिअल ट्रस्टचे अध्यक्ष, नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, सांगली जिल्हा सहकार बोर्डचे माजी अध्यक्ष, जिल्हा सहकार मुद्रणालय माजी अध्यक्ष आदी पदांवर त्यांनी काम केले होते.