बाबासाहेब कांबळे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST2021-09-10T04:32:42+5:302021-09-10T04:32:42+5:30

संख : येळवी (ता. जत) जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब शंकर कांबळे यांचा लोकनियुक्त सरपंच विजयकुमार ...

Babasaheb Kamble felicitated on the occasion of his retirement | बाबासाहेब कांबळे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

बाबासाहेब कांबळे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार

संख : येळवी (ता. जत) जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब शंकर कांबळे यांचा लोकनियुक्त सरपंच विजयकुमार पोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक भारत क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. कांबळे म्हणाले, यापुढील काळात शाळा शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांचा शोध घेत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं काम करणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणार आहे.

यावेळी उपसरपंच सुनील अंकलगी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लिंबाजी सोलंनकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, महेश शिंदे, शशिकांत गानमोटे, मुख्यापक भारत क्षीरसागर, सुखदेव शिंदे, नंदकुमार खंडागळे, सुदाम वाघमारे, बजरंग चव्हाण, रामकृष्ण गंगणे, नवनाथ पवार, दत्तात्रय चौगुले, कृष्णा देवकते, लक्ष्मण आवटे, अतुल गडदे, संजय कोळी, तात्याराव चव्हाण उपस्थित होते. भारत क्षीरसागर यांनी आभार मानले.

फोटो : ०९ संख १

ओळ : येळवी (ता. जत) जिल्हा परिषद शाळेत सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब शंकर कांबळे यांचा सरपंच विजयकुमार पोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुनील अंकलगी, लिंबाजी सोलनकर उपस्थित होते.

Web Title: Babasaheb Kamble felicitated on the occasion of his retirement