बबन महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST2021-05-06T04:28:30+5:302021-05-06T04:28:30+5:30
फोटो - ०५०५२०२१-आयएसएलएम-बबन महाडिक निधन येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील बबन शामराव महाडिक (वय ६१, सध्या रा. राधानगरी, ...

बबन महाडिक
फोटो - ०५०५२०२१-आयएसएलएम-बबन महाडिक निधन
येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील बबन शामराव महाडिक (वय ६१, सध्या रा. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पवन महाडिक, विजय महाडिक ही दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
बबन महाडिक हे प्रगतशील शेतकरी होते. त्यांची राधानगरी व आंबे, चिंचोली (ता. पंढरपूर) येथे मोठ्या प्रमाणावर शेती आहे. ते शेतीत नवनवीन प्रयोग करत असत. ऊस, डाळिंब पिकांचे उत्पादन घेत होते. शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रातही पेट्रोल पंप काढून प्रगतशील शेतकरी व उद्योजक असं नाव त्यांनी राधानगरी परिसरात कमावले आहे. ते माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांचे पुतणे व माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, वाळवा पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, येलूर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजन महाडिक यांचे चुलत बंधू होत.