गदिमांच्या साहित्याचा सोमवारी राज्यभरात जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:23+5:302020-12-12T04:42:23+5:30

सांगली : गदिमांच्या यथोचित स्मारकासाठी राज्यभरातील साहित्यिक व कलावंत सोमवारी (दि. १४) गदिमांच्या साहित्याचा गजर करणार आहेत. त्यांच्या कविता, ...

Awareness of Gadima's literature spread across the state on Monday | गदिमांच्या साहित्याचा सोमवारी राज्यभरात जागर

गदिमांच्या साहित्याचा सोमवारी राज्यभरात जागर

सांगली : गदिमांच्या यथोचित स्मारकासाठी राज्यभरातील साहित्यिक व कलावंत सोमवारी (दि. १४) गदिमांच्या साहित्याचा गजर करणार आहेत. त्यांच्या कविता, गीते वाचून अनोखे जनआंदोलन करणार आहेत.

जेष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. अविनाश सप्रे, गदिमांच्या कुटुंबातील सदस्य मुक्तेश्वर माडगूळकर आदी साहित्यिक सहभागी होणार असल्याची माहिती जनआंदोलन समितीतर्फे महेश कराडकर आणि प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, पुण्यासोबतच आटपाडी तालुक्यातील माडगुळे या त्यांच्या मूळ गावी स्मारक व्हावे, अशी गदिमाप्रेमींची मागणी आहे, परंतु सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही. २०१८-१९ या गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षातही काम सुरू झाले नाही. शेटफळे येथील सध्याचे स्मारक म्हणजे साधे सभागृह आहे, परंतु गदिमांच्या तोलामोलाचे स्मारक माडगुळे येथे व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यासाठी सोमवारी गदिमांच्या पुण्यतिथीदिनी जनआंदोलन करण्यात येईल.

यावेळी राज्यभरातून लाखोंच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनाचे प्रमुख संयोजक प्रदीप निफाडकर यांनी सांगितले.

जनआंदोलनात गदिमांचे कुटुंबीय, सुधीर इनामदार, सुभाष कवडे, सादिक खाटीक, प्रा. सयाजीराव मोकाशी, रघुराज मेटकरी, डॉ. स्वाती शिंदे-पवार, तानाजी जाधव, डॉ. भारती पाटील, चंद्रकांत देशमुखे, दीपक पवार, सदानंद माळी, संतोष काळे, किरण शिंदे, शरद जाधव, जयंत आवटे, नामदेव भोसले, धनदत्त बोरगावे, ऋजुता माने, दयासागर बन्ने, प्रा. अनिलकुमार पाटील, मनीषा पाटील, लवकुमार मुळे, मच्छिंद्र ऐनापुरे, दि. बा. पाटील, वसंत पाटील, बाबासाहेब परीट, प्रा. संजय ठिगळे, प्रतिभा जगदाळे, वर्षा चौगुले, गौतम कांबळे, अर्चना मुळे, अभिजित पाटील, प्रमोद चौगुले, डॉ. अनिल मडके आदींचा प्रमुख सहभाग आहे. सकाळी दहा वाजता व्हाईट हाऊस सभागृहात सुरुवात होईल.

-----

Web Title: Awareness of Gadima's literature spread across the state on Monday