प्रकाश सावंत यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:32 IST2021-09-07T04:32:23+5:302021-09-07T04:32:23+5:30

पुनवत : गवळेवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रकाश केरू सावंत यांना जायंट्स ग्रुप ऑफ ...

Award to Prakash Sawant | प्रकाश सावंत यांना पुरस्कार

प्रकाश सावंत यांना पुरस्कार

पुनवत : गवळेवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रकाश केरू सावंत यांना जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार पोळ, डॉ. रामनारायण उंटवाल, शिराळा नगराध्यक्षा सुनीता निकम, प्रा. डॉ. शिल्पा कुरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षक प्रकाश सावंत यांनी पुनवत आणि गवळेवाडी शाळेत उल्लेखनीय कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा व शैक्षणिक साहित्य निर्मितीत जिल्हा, विभागीय स्तरांपर्यंत यश मिळविले आहे. स्वच्छ सुंदर शाळेचा पुरस्कारही त्यांनी शाळेस मिळवून दिलेला आहे. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Web Title: Award to Prakash Sawant