शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट: अखेर कृष्णा, भीमा खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:55 IST

जुन्या टेंडर करारास मुदतवाढ करून यंत्रणा सुरू करण्यास मंजुरी

शिराळा (जि.सांगली) : कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर शासन खडबडून जागे झाले असून, पुणे येथे तातडीने बैठक घेण्यात आली. शासनस्तरावर जुन्या टेंडर करारास मुदतवाढ करून ही व्यवस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आणि काही तासांतच ही यंत्रणा सुरू झाली.या खोऱ्यातील स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली होती. यामुळे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहितीच उपलब्ध होत नव्हती. ही यंत्रणा अद्यापच बंद असल्याने आपत्ती व्यवस्थापन कसे करणार? असा प्रश्न पडला होता.

वाचा - कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे? ही यंत्रणा चालविण्याचा पाच वर्षांचा करार दि. ११ जूनला संपल्याने, तसेच मंत्रालयातून नवीन करारास अद्याप मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे ही यंत्रणा असून कुचकामी ठरली होती. सोमवार, दि. २३ रोजी याबाबत बैठक होऊन जुन्या टेंडर करारास या पावसाळ्याअखेर मुदतवाढ करूनही व्यवस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

शासनामार्फत जुन्या टेंडर करारास पावसाळ्यामार्फत मुदतवाढ करून ही व्यवस्था लवकरात लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीची पाणीपातळी याची माहिती संकलित करावी, असे संबंधित ठेकेदारांना कळविले आहे. संबंधित ठेकेदारांनी ही यंत्रणा सुरू केली आहे. - मयुरा जोशी, कार्यकारी अभियंता, जलविज्ञान विभाग, सांगली.