इस्लामपुरात सेंट्रींग कामगाराच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:25 IST2021-03-18T04:25:54+5:302021-03-18T04:25:54+5:30

इस्लामपूर : शहरातील चाँद तारा मोहल्ला परिसरातील सेंट्रींग कामगाराच्या मांडीवर चाकूने सपासप वार करत आणि डोक्यात दगड घालून तिघा ...

Attempted murder of a centering worker in Islampur | इस्लामपुरात सेंट्रींग कामगाराच्या खुनाचा प्रयत्न

इस्लामपुरात सेंट्रींग कामगाराच्या खुनाचा प्रयत्न

इस्लामपूर : शहरातील चाँद तारा मोहल्ला परिसरातील सेंट्रींग कामगाराच्या मांडीवर चाकूने सपासप वार करत आणि डोक्यात दगड घालून तिघा जणांच्या टोळक्याने त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला.

पैगंबर हमीद संदे (वय २७) हा सेंट्रींग कामगार या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार अक्षय नलवडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरूद्ध पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पैगंबर संदे याने त्याचा मावसभाऊ रफीक सैदेखान आणि अक्षय नलवडे यांच्यातील भांडण सोडविले होते. हा राग मनात धरून अक्षय नलवडे याने मंगळवारी दुपारी पैगंबर संदे याला अडवून आज याला जिवंत सोडायचा नाही, याची मस्ती जिरवायची, असे म्हणत चाकूने पैगंबर संदेच्या गळ्यावर वार केला. मात्र, तो वार चुकवल्यावर नलवडे याने त्याच्या उजव्या पायाच्या मांडीवर चाकूने वार केले, तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने दगड उचलून संदेच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attempted murder of a centering worker in Islampur