किल्ले मच्छिन्द्रगड येथे पुजाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:17 IST2021-07-05T04:17:44+5:302021-07-05T04:17:44+5:30
इस्लामपूर: किल्ले मच्छिन्द्रगड (ता.वाळवा) येथील मच्छिन्द्रनाथ गडावर पुजारी म्हणून काम पाहणाऱ्यास तिघा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपरण्याने त्याचा गळा ...

किल्ले मच्छिन्द्रगड येथे पुजाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न
इस्लामपूर: किल्ले मच्छिन्द्रगड (ता.वाळवा) येथील मच्छिन्द्रनाथ गडावर पुजारी म्हणून काम पाहणाऱ्यास तिघा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपरण्याने त्याचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी १० च्या सुमारास घडला. संशयितांनी दुकानातील साहित्याची नासधूस केली. पोलिसांनी यातील एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
सुनील कानिफनाथ पुजारी (२७) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल शंकर साळुंखे, अभिजित अशोक कदम आणि अण्णासाहेब उर्फ विजय शंकर साळुंखे (तिघे रा.कि. म.गड) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील विजय साळुंखे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सुनील पुजारी हे मच्छिन्द्रनाथ मंदिरात पूजा-अर्चा करण्याचे काम करतात. मंदिराच्या बाजूलाच त्यांचे दुकान आहे. वरील तिघे हे नेहमी गडावर येऊन दंगामस्ती करत असतात. यापूर्वी त्यांना अनेकवेळा समज देण्यात आली आहे. मात्र तरीही रविवारी सकाळी हे तिघे सुनील पुजारी हे त्यांच्या दुकानात बसले असताना तिथे आले. दुकानात घुसून साहित्याची नासधूस केली. तसेच पुजारी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. एकाने आपल्याकडील उपरने पुजारी यांच्या गळ्याभोवती टाकून त्यांचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना तिथे आलेल्या इतर भाविकांनी ही भांडणे सोडविली. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करत आहेत.