मिरजेत टँकर क्लीनरचा चावा घेऊन चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:32 IST2021-07-14T04:32:13+5:302021-07-14T04:32:13+5:30

बसस्थानक परिसरात ऑईल टँकर उभा करण्यात आला होता. दुपारी काही नशेखोर तरुण टँकरची काच उघडून आत घुसून ...

Attempt to steal by taking bite of Miraj tanker cleaner | मिरजेत टँकर क्लीनरचा चावा घेऊन चोरीचा प्रयत्न

मिरजेत टँकर क्लीनरचा चावा घेऊन चोरीचा प्रयत्न

बसस्थानक परिसरात ऑईल टँकर उभा करण्यात आला होता. दुपारी काही नशेखोर तरुण टँकरची काच उघडून आत घुसून चोरी करत होते. या वेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने टँकरचा क्लीनर साहिल शेख यास बेदम मारहाण करून त्याच्या हाताचा चावा घेऊन त्याला जखमी केले. शेख यास उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिरज बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात गेले चार दिवस अमली पदार्थाच्या व्यसनी तरुणांकडून प्रवासी व नागरिकांना मारहाण करून लुटण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी पाच जणांना अटक केली. भरदिवसा चोरीचा प्रयत्न व मारहाणीच्या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात दहशत निर्माण झाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या नशेखोर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Attempt to steal by taking bite of Miraj tanker cleaner