शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील राजकिशोर वधू-वर केंद्रावर हल्लाबोल, फसलेले तरूण आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 12:14 IST

राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारा केंद्राचा प्रमुख राजकिशोर शिंदे याला पकडण्यात पोलिस दिरंगाई करीत असल्याने फसगत झालेल्या लोकांनी शनिवारी या केंद्रावर हल्लाबोल केला. केंद्राचे कुलूप तोडून प्रवेश केला.

 सांगली - राजकिशोर वधू-वर सूचक केंद्राच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालणारा केंद्राचा प्रमुख राजकिशोर शिंदे याला पकडण्यात पोलिस दिरंगाई करीत असल्याने फसगत झालेल्या लोकांनी शनिवारी या केंद्रावर हल्लाबोल केला. केंद्राचे कुलूप तोडून प्रवेश केला. संपूर्ण केंद्राची झाडाझडती घेतली. पण गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच संशयित शिंदे याने केंद्रातील सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर तसेच रेकॉर्ड गायब केल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्राचे प्रमुख राजकिशोर शिंदे, पत्नी विजया शिंदे व व्यवस्थापक श्रीमती देशमुख (पूर्ण नाव अजूनही निष्पन्न नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा चार दिवसापूर्वी गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी शशिकांत हुल्याळ (सीतारामनगर, सांगली), लक्ष्मण महादेव खारे (म्हैसगाव, ता. माढा), अनिल हणमंत जगदाळे (तासगाव) या तिघांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्याशिवाय आणखी सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. वधू-वर सूचक केंद्र चालविणाºयाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही पहिली घटना घडली आहे. संशयितांनी वधू-वर सूचक के्रंद्राची जाहिरात केली. जाहिरात वाचून अनेकांनी त्यांना संपर्क साधला. संशयितांनी त्यांच्याकडून पैसे वसूल केले; पण प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही स्थळ काढले नाही. पोलिस मागावर असल्याची चाहूल लागताच संशयितांनी पलायन केले. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे शनिवारी माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, सामाजिक कार्यकर्त्या रेखा पाटील यांच्या माध्यमातून फसगत लोकांनी या केंद्राकडे धाव घेतली. पण त्याला कुलूप होते. लोकांनी कुलूप तोडून केंद्रात प्रवेश केला. हे केंद्र आपटा पोलिस चौकीजवळ आहे. केंद्रामध्ये मुला-मुलींचे मेकअपमधील फोटो भिंतीवर लावले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पण त्यामधील डीव्हीआर गायब केलेला आहे. तसेच रजिस्टर, रेकॉर्ड वहीही गायब केल्याचे उघडकीस आले आहे. तेवढ्यात राजकिशोर शिंदेचा मुलगा आला. त्याला लोकांनी चांगलेच धारेवर धरले.पोलिसप्रमुखांकडे धावआपटा पोलिस चौकीजवळ शिव आर्नेट अपार्टमेंटमध्ये हे केंद्र आहे. तेथील रहिवाशांनीही शनिवारी सायंकाळी अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन या केंद्रात वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली भलताच व्यवसाय चालत असल्याचा आरोप केला. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सामााजिक कार्यकर्त्या रेखा पाटील यांच्यासह संदीप सकळे, विपूल देडिया, मनोज कुलकर्णी, प्रकाश मगर उपस्थित होते.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र