अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने खून; लंगरपेठ येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2023 15:06 IST2023-11-15T15:05:50+5:302023-11-15T15:06:06+5:30
अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने खून; लंगरपेठ येथील घटना
महेश देसाई, लोकमत न्यूज नेटवर्क, कवठेमहांकाळ: लंगरपेठ (ता.कवठेमहांकाळ) येथील संभाजी जगन्नाथ शिंदे वय 32 या युवकाचा अज्ञात कारणावरून अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवार राञी 10 च्या सुमारास घडली आहे. अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी मयत संभाजी शिंदे यांचे लंगरपेठ येथे किरणा दुकान असून ते दुकान बंद करून घरी शिंदे मळा येथे बुधवार रञी 9 ते 10 च्या सुमारास जात असताना आज्ञात तीन इसमानी लंगरपेठ ते शिंदे वस्ती कच्च्या रस्त्यावर ओढ्याच्या बाजूला धारदार हत्याराने शिंदे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या खुनाचे कारण अजून स्पष्ट झाले नसून अज्ञात तीन इसमावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील हे करीत आहेत.