अंकलेत किरकाेळ वादातून एकावर काेयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST2021-01-03T04:27:43+5:302021-01-03T04:27:43+5:30

जत : अंकले (ता. जत) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून भाऊसाहेब शामराव ऐडके (वय ४६, ...

An attack on one of the minor disputes in Ankle | अंकलेत किरकाेळ वादातून एकावर काेयत्याने हल्ला

अंकलेत किरकाेळ वादातून एकावर काेयत्याने हल्ला

जत : अंकले (ता. जत) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून भाऊसाहेब शामराव ऐडके (वय ४६, रा. अंकले) यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून

पोलिसांनी विकास विलास दुधाळ, श्रीकांत युवराज दुधाळ, अमोल विलास दुधाळ व अजय रावसाहेब दुधाळ (सर्व रा. अंकले, ता. जत) या चारजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता घडली. १ जानेवारी रोजी रात्री उशिरा याबाबत जत पोलिसांत भाऊसाहेब ऐडके यांनी फिर्याद दिली आहे.

भाऊसाहेब ऐडके व दुधाळ कुटुंबात मागील दोन महिन्यांपूर्वी किरकोळ घरगुती कारणातून वाद निर्माण झाला होता. याबद्दल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे, पुन्हा तोच वाद उकरून काढून फिर्यादी ऐडके हे शेतातील विहिरीवरील विद्युतमोटर बंद करून एकटे घरी जात असताना वरील चारही आरोपींनी कोयता, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शंकर पवार करत आहेत.

Web Title: An attack on one of the minor disputes in Ankle