छेडछाडीबद्दल जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:45+5:302021-09-22T04:29:45+5:30
याबाबत कुंडल पोलिसातून मिळालेली मिळालेली माहिती अशी, घोगाव येथील दिलीप देवकुळे मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या दरम्यान घरासमोर उभे असता योगेश ...

छेडछाडीबद्दल जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांवर हल्ला
याबाबत कुंडल पोलिसातून मिळालेली मिळालेली माहिती अशी, घोगाव येथील दिलीप देवकुळे मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या दरम्यान घरासमोर उभे असता योगेश कांबळे याच्या घराजवळ भांडणाचा आवाज आला. देवकुळे तेथे गेले असता मुलीचे वडील आणि कांबळे यांच्यात वाद सुरू असल्याचे दिसले. मुलीची छेड का काढतोस, म्हणून मुलीच्या वडिलांनी जाब विचारला असता योगेश कांबळे व कल्याणी कांबळे, कुणाल कांबळे यांनी काठ्यांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. दिलीप देवकुळे भांडण सोडविण्यास गेले असता संशयितांनी त्यांच्याही दंडावर, खांद्यावर व मानेवर कोयत्याने वार केले. या घटनेची नोंद कुंडल पोलिसात झाली असून घटनास्थळी तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी भेट देऊन पुढील तपासासंदर्भात सूचना दिल्या. संशयित फरारी असून शोध सुरू आहे.