शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 15:35 IST

१९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.

ठळक मुद्देराजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित

अविनाश बाडआटपाडी : १९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.राजेंद्रअण्णा देशमुख आणि अण्णासाहेब लेंगरे वगळता आजपर्यंत तालुक्यातून विधानसभेवर कोणीच गेलेले नाही. ५७ वर्षांत अमरसिंह देशमुख यांनी एकदा अल्पकाळासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. हे अपवाद वगळता तालुक्यातील नेतृत्वाला सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित राहिला.आटपाडी तालुका यापूर्वी लोकसभेच्या पंढरपूर मतदारसंघाला जोडला होता, तेव्हा खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती होती. खासदार रामदास आठवले यांच्या कालावधित तालुक्यात अधुनमधून दौरे व्हायचे. त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात आटपाडीचा समावेश झाला. प्रतीक पाटील आणि संजयकाका पाटील यांना संधी मिळाली.

पण आटपाडीतील कोणत्याच नेत्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करून जिल्ह्याचे लक्ष यापूर्वी कधीच वेधून घेतलेले नाही. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली. आधी भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक नंतर नंतर कमळाला डेंजर झोनकडे घेऊन गेली.निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल. पण त्याबाबत सध्या तरी ठामपणे, छातीठोकपणे सांगणाऱ्या राजकीय निरीक्षकांची वानवाच आहे. जिल्हा ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीने आटपाडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. पडळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची जिल्ह्यातील नेत्यांना मनधरणी करावी लागली. त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. या तापलेल्या राजकीय वातावरणाचा येत्या विधानसभा निवडणुकीत कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.वंचित आघाडीची मोट अशीच कायम राहिली, तर येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीतून विधानसभा निवडणुकीत कोण निवडणूक लढविणार, कोण जिंकणार, कोणामुळे मतांचे विभाजन होऊन प्रस्थापित उमेदवाराला धूळ चारणार, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची सूत्रे प्रथमच काही प्रमाणात का असेनात, पण आटपाडी तालुक्यातून हलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाले तर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात आटपाडी तालुक्याचे वेगळे स्थान निर्माण होईल यात शंका नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणSangliसांगली