आटपाडीत दुकाने बंद, संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:13+5:302021-04-09T04:29:13+5:30
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सध्या बंद आहेत. औषधांची दुकाने आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू आहेत, मात्र कापड दुकान, ...

आटपाडीत दुकाने बंद, संभ्रम कायम
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने सध्या बंद आहेत. औषधांची दुकाने आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू आहेत, मात्र कापड दुकान, ज्वेलर्स यांच्यापासून पानटपरी किंवा छोट्या विक्रेत्यांपर्यंत सर्वांमध्ये नाराजी आहे. दुकाने बंद असल्याने दिवसभर व्यापारीपेठेत शुकशुकाट असतो. दुकानांमधील मजूर बेरोजगार झाले आहेत. अनेक हॉटेल्स बंद आहेत. देशी दारूची दुकाने बंद असली तरी अनेक बारमधून पाठीमागील दारातून दारूची विक्री जादा दराने सुरू आहे.
कोट
गुढीपाडव्याच्या मुहूर्तासाठी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली आहे. बँकांचे व्याज वाढत आहे. दुकानांची भाडी वाढत आहेत आणि शासनाने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमची मोठी अडचण झाली आहे. शासनाने निदान सोमवारपासून तरी दुकाने उघडण्याचा निर्णय घ्यावा.
- सुरेश चव्हाण,
माजी अध्यक्ष, आटपाडी सराफ असोसिएशन
फोटो : आटपाडीत रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आहे. अण्णा भाऊ साठे चौक ते ग्रामपंचायत चौकापर्यंतच्या रस्त्यावरील गर्दी कमालीची रोडावली आहे.