आटपाडी पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:25 IST2021-03-25T04:25:31+5:302021-03-25T04:25:31+5:30

सांगली : आटपाडी पंचायत समिती सभापती भूमिका प्रताप बेरगळ यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला ...

Atpadi Panchayat Samiti chairperson resigns | आटपाडी पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

आटपाडी पंचायत समिती सभापतींचा राजीनामा

सांगली : आटपाडी पंचायत समिती सभापती भूमिका प्रताप बेरगळ यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिला असून, कोरे यांनी तो मंजूर करून प्रशासनाकडे सादर केला आहे. सभापतीपद भरण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, असा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी यांच्याशी केला आहे.

आटपाडी पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचे नेते, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर गटाची सत्ता आहे. प्रत्येक सदस्य आणि गटाला सभापतिपदाची संधी मिळावी, यासाठी भूमिका बेरगळ यांनी राजीनामा दिला आहे. भूमिका बेरगळ यांनी कोरे यांच्याकडे दि. १९ मार्च रोजी राजीनामा दिला होता. कोरे यांनी राजीनामा मंजूर करून प्रशासनाकडे पाठविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी बेरगळ यांच्या राजीनाम्यामुळे आटपाडी पंचायत समिती सभापतीपद रिक्त झाले असून, सभापती निवडीबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी, असे जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.

Web Title: Atpadi Panchayat Samiti chairperson resigns