शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Sangli: आटपाडीतील सराफी दुकान फोडून १७ लाखांचा ऐवज लंपास, चोरटे चोरीच्याच मोटारीतून पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:03 IST

चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा व संचाची तोडफोड केली. सीसीटीव्ही चित्रीकरणामधील मागील काही दिवसांचे चित्रीकरण काढून टाकले.

आटपाडी : आटपाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत रविवारी रात्री सराफी दुकान फोडून चोरट्यानी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १७ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत ओम गणेश ज्वेलर्सचे मालक शंकर रघुनाथ चव्हाण (रा. यमाजी पाटलाचीवाडी) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी या घटनेत चोरीच्याच वाहनांचा वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आटपाडीच्या मुख्य बाजार पेठेमध्ये एसटी बसस्थानकानजीक शंकर चव्हाण यांचे ओम गणेश ज्वेलर्स हे दुकान आहे. रविवारी सर्व सराफ व्यावसायिकांची साप्ताहिक सुट्टी असते. याचा गैरफायदा घेत रविवारी रात्री व सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चव्हाण यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे साडेवीस किलो चांदीचे सुमारे सहा लाख १५ हजार रुपयांचे दागिने, पाच लाख रुपयांचे वीस तोळे जुने मोडीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाच लाख ७५ हजार रुपये असा एकूण १६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.यावेळी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा व संचाची तोडफोड केली. सीसीटीव्ही चित्रीकरणामधील मागील काही दिवसांचे चित्रीकरण काढून टाकले.

या दुकानाच्या शेजारी महाराष्ट्र प्रिंटिंग प्रेस आहे. या प्रेसचे मालक त्याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात. त्यांच्या घरातील एका महिलेस खाली दुकानाजवळ कशाचा तरी आवाज येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी वरच्या मजल्यावरुन खाली येऊन पाहण्याचा प्रयत्न करत असतानाच चोरट्यांना त्यांची चाहुल लागली आणि त्यांनी तेथून पोबारा केला.घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पण श्वान घटनास्थळीच घुटमळले.चोरटे सांगोल्याचे असल्याची शंका

हे चोरटे सांगोला तालुक्यातून आले असल्याचे तपासात पुढे आले आहे. चोरट्यांनी वाकी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथून एक चारचाकी वाहन चोरून आणले होते. ते वाहन आटपाडीतील मुलाणकी येथे सोडले. तेथीलच जावेद मुलाणी यांची मोटार त्यांनी चोरली. त्या गाडीतूनच त्यांनी आटपाडी शहरात प्रवेश केला. सराफी दुकानात चोरी केली आणि पुन्हा त्याच मोटारीतून सांगोला तालुक्यात प्रवेश केला. बामणी येथे ही मोटार सोडून त्यांनी पळ काढला. यामुळे चोरटे सांगोला तालुक्यातील असण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी