शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पाच्या ‘एंट्री’वर बेधुंद होऊन नाचायला लागला, सांगलीत चाहत्याला पोलिसांनी ताब्यात घेतला, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:26 IST

सांगली : सध्या प्रेक्षकांची गर्दी खेचत असलेल्या ‘ पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका चाहत्याने चक्क कपडे काढून टाकत ...

सांगली : सध्या प्रेक्षकांची गर्दी खेचत असलेल्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी एका चाहत्याने चक्क कपडे काढून टाकत ठेका धरला. त्यामुळे महिला वर्गाला माना खाली घालाव्या लागल्या. प्रेक्षकांनी आरडाओरड केल्यानंतरही त्याचा धिंगाणा सुरूच होता. अखेर पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवला.पुष्पा २ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये याची चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच चित्रपटगृहांत चाहत्यांची गर्दी दिसत आहे. शहराबाहेरील न्यू प्राईड येथे चित्रपट पाहण्यासाठी एक चाहता मित्रासोबत गेला होता. चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्याने ‘पुष्पा’ स्टाइलप्रमाणे चालत त्याने अनेकांचे लक्ष वेधले. चित्रपट सुरू झाल्यानंतर पुष्पा एंट्रीवर शिट्यांचा पाऊस पडला. तेव्हा हा चाहता लागलीच जागा झाला. त्याने स्वत:ला पुष्पा समजत पडद्यासमोर जाऊन स्वतःचे कपडे काढून टाकले. त्यानंतर तो नाचायला लागला. चित्रपट पाहण्यासाठी अनेक महिलांचीही उपस्थिती होती. त्याचा नाच पाहून महिलांनी मान खाली घातली. काहींनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे तक्रार केली. तेथून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना थेट फोन गेला. त्यांनी तातडीने पोलिस कर्मचारी पाठवले. पोलिसांनी तातडीने मल्टिप्लेक्समध्ये येऊन चाहत्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत हा चाहता धुंदीतच होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने माफी मागितली. पुन्हा चित्रपटच पाहणार नाही, अशी शपथ घेतली.

टॅग्स :SangliसांगलीPushpaपुष्पाPoliceपोलिस