ग्रामीणचा टक्का वाढल्याने चिंता विधानसभा निवडणूक :
By Admin | Updated: October 16, 2014 22:51 IST2014-10-16T22:21:08+5:302014-10-16T22:51:23+5:30
सांगली मिरज क्षेत्रातील टक्का झाला कमी, आकड्यांवर व्यक्त केले जाताहेत अंदाज

ग्रामीणचा टक्का वाढल्याने चिंता विधानसभा निवडणूक :
सांगली : महापालिका क्षेत्रातील मतांचा टक्का घटला असतानाच ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी मतांचा टक्का वाढल्याने अनेकांना चिंता लागली आहे. मतांचा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा आणि तोट्याचा यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मतांचा टक्का वाढावा म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न झाले होते. ग्रामीण भागातून त्याप्रमाणे टक्का वाढला असला तरी, या वाढलेल्या व कमी झालेल्या टक्केवारीवर निकालाचे गणित मांडले जात आहे. मतदानाची प्रक्रिया बुधवारी पार पडल्यानंतर मतांच्या अंतिम आकड्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुरुवारी प्रशासनाने याबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली. जिल्ह्यातील आठपैकी सांगली व मिरज या दोनच मतदारसंघात साठ टक्क्यांच्या घरात मतदान झाले आहे. उर्वरित सर्वच मतदारसंघात ६५ टक्क्यांवर मतदान झाले आहे. यातही ग्रामीण भागातील मतांचे आकडे मोठे आहेत. मतदानाच्या आकडेवारीची तुलना गत निवडणुकीतील आकड्यांशी केली जात आहे. बहुतांश मतदारसंघातील मतदानाचे आकडे यंदा वाढले आहेत. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला त्याचा फटका बसणार, याची चर्चा आता रंगलेली आहे. अशा गणिताला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी, त्याची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते. यंदाही त्यापद्धतीने सुरू आहे. पारंपरिक अंदाज व्यक्त करण्याच्या गावोगावी आणि गल्लोगल्ली अशाचप्रकारच्या चर्चांना आता ऊत आला आहे. आकडेवारीवरून आता पैजाही लावल्या जात आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या मतदानाच्या आकडेवारीत २.५५ टक्के इतकी वाढ झाली आहे. तुलनेने गतवेळेपेक्षा मतदानाचा टक्का घटलेल्या मतदारसंघात मिरज आणि इस्लामपूर या दोन मतदारसंघाचा समावेश आहे. निवडणुकीत मताचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली होती. त्याचा परिणामही ग्रामीण भागात जाणवला. (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारी मतदारसंघ२००९ मध्ये २०१४ मध्ये सांगली५८.७६ ५९.११ शिराळा७७.४७ ७८.८७ तासगाव-क. म.६३.४४ ७६.६१ पलूस-कडेगाव७८.०० ८१.६४ मिरज६२.७३ ६१.३० खानापूर६७.५१ ७३.१४ इस्लामपूर७५.५९ ७२.०३ जत६६.०० ६८.0८ एकूण६८.६८ ७०.८४ सर्वाधिक मतदान पलूस-कडेगावमध्ये मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पलूस-कडेगावने मतदानात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. याठिकाणी ८१.६४ टक्के मतदान झाले आहे. यात १ लाख ७ हजार २0५ पुरुषांनी तर ९९ हजार ८५८ महिलांनी मतदान केले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान सांगली विधानसभा मतदारसंघात नोंदले गेले आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या ही उर्वरित सात मतदारसंघापेक्षा अधिक आहे. याठिकाणची एकूण मतदारसंख्या ३ लाख २८ हजार ३७0 इतकी आहे. तरीही सांगलीत केवळ ५९ टक्के मतदान झाले. मिरजेतही कमी मतदानाची नोंद झाली. मिरजेची एकूण मतदारसंख्या ३ लाख १ हजार ४३७ इतकी आहे. सांगलीनंतर सर्वाधिक मतदारसंख्या मिरजेत आहे. तरीही मिरजेत ६१.३0 टक्के मतदान झाले. महापालिका क्षेत्रातील मोठा भाग या दोन्ही मतदारसंघात येतो. शहरी चेहरा असलेल्या या मतदारसंघात मतदानाबाबतची उदासीनता स्पष्टपणे दिसून आली. मिरजेत ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान मिरज : मिरज विधानसभेसाठी ग्रामीण भागात सर्वाधिक ७० ते ७५ टक्के व मिरज शहरात केवळ ५५ टक्के मतदान झाले. शहरात मतदान कमी झाल्याने त्याचा कोणाला फटका बसणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. विधानसभेसाठी पंचरंगी लढत असतानाही शहरात मतदान कमी झाले. मिरज पूर्व भागातील मालगाव, आरग, बेडग यासह अन्य गावांत चुरशीने ७० ते ७५ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारीही कमी झाल्याने त्याचा कोणाला फायदा व कोणाला तोटा होणार, याचे आडाखे बांधण्यात येत आहेत. शहरात सुमारे सव्वालाख मतदार आहेत. ग्रामीण व शहरातील मतदानाच्या आकडेवारीमुळे कौल कुणाला मिळणार, याची उत्सुकता आहे. (वार्ताहर)