आष्ट्याचा भावई उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:18 IST2021-06-30T04:18:14+5:302021-06-30T04:18:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव रविवार, दि. ४ जुलै ते शनिवार ...

आष्ट्याचा भावई उत्सव रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा :
येथील ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव रविवार, दि. ४ जुलै ते शनिवार १० जुलैअखेर साजरा करण्यात येणार होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने यावर्षी उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मंदिराचे मालक पृथ्वीराज थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाले की, ग्रामदैवत श्री चौंडेश्वरीचा भावई उत्सव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवाला सुमारे १२०० पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. आष्टा शहरातील सर्व जातिधर्माचे लोक, बारा बलुतेदार हा उत्सव एकत्रित येऊन साजरा करतात. दिवा, कंकण, आळूमुळू, पिसे, जोगण्या, मुखवटे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहेत. जत्रा-यात्रा, धार्मिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातलेली आहे.
आष्टा येथील भावई उत्सव भरविल्यास कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ शकतो. तो टाळण्यासाठी उत्सव यावर्षी साजरा करण्यात येणार नाही. भाविकांनी घरी थांबून उत्सव साजरा करावा.
यावेळी देवस्थानचे व्यवस्थापक व्यंकटेश ताम्हणकर, ऋतुराज थोरात, विजय कावरे, सचिन दमामे उपस्थित होते.