शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत अचानक वाढल्या बीएएमएसच्या तब्बल ९२० जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2023 08:37 IST

आयुर्वेदिक महाविद्यालयांमधील प्रवेशात शासनाचे ‘बैल गेला अन् झोपा केला’

- अविनाश कोळीसांगली : महाराष्ट्र सी.ई.टी. सेलमार्फत आयुष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असतानाच १० नोव्हेंबर रोजी अचानक ८ नवीन आयुर्वेदिक महाविद्यालयांमधून ५६० जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत १२ महाविद्यालयांमध्ये एकूण ९२० जागा अचानक वाढल्यामुळे इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी नीट परीक्षेसाठी ५० हजारांहून अधिक विद्यार्थी पात्र झाल्याने यावर्षी एम.बी.बी.एस. आणि  इतर अभ्यासक्रमांचा कट-ऑफ वाढला आहे. 

अनेक विद्यार्थ्यी गेले दुसरीकडे एम.बी.बी.एस.नंतर विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा बी.ए.एम.एस.कडे असतो. कट-ऑफ वाढल्यामुळे आयुर्वेदिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही म्हणून कमी गुण असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी दंतवैद्यकीय, होमिओपॅथी तसेच इतर अभ्यासक्रमांना नाइलाजाने प्रवेश घेतला.

जागा वाढलेली आयुर्वेद महाविद्यालये 

प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना ३१ ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील सुमतीबाई ठाकरे आयुर्वेद कॉलेज, अहमदनगरचे रत्नदीप आयुर्वेद कॉलेज, आयुर्वेद कॉलेज अहमदनगर या तीन नवीन कॉलेजेसमधून तिसऱ्या फेरीत २६० जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी चौथ्या फेरीत प्रदीप पाटील आयुर्वेद कॉलेज शाहुवाडी या कॉलेजमधून १०० नवीन जागांसाठी नव्याने परवानगी देण्यात आली. आणि आता १० नोव्हेंबर रोजी अचानकपणे तब्बल ८ नवीन आयुर्वेद कॉलेजमधून ५६० जागा भरण्यास पाचव्या फेरीत परवानगी देण्यात आली आहे. इतर अभ्यासक्रमांना याआधी प्रवेश घेतलेला आहे, त्यांना मात्र वाढलेल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात आयुर्वेद महाविद्यालयांना इतक्या मोठ्या संख्येने परवानगी देणे योग्य नाही. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय महाविद्यालयांच्या मान्यतेचा घोळ मिटवला पाहिजे. राज्यात आता २२ सरकारी आणि ८२ खासगी आयुर्वेद महाविद्यालये आहेत. नवीन महाविद्यालये वाढविण्यापेक्षा आहे त्या महाविद्यालयांचा दर्जा आणखी सुधारणे आवश्यक आहे.    - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र