लठ्ठे पॉलिटेक्निकच्या राज्यस्तरीय टेक्नोव्हिजन स्पर्धेत आर्या जाधव प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:18 IST2021-07-03T04:18:17+5:302021-07-03T04:18:17+5:30

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील लठ्ठे पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘टेक्नोव्हिजन’ स्पर्धेत अहमदनगर येथील ...

Arya Jadhav first in the state level technovision competition of Lathe Polytechnic | लठ्ठे पॉलिटेक्निकच्या राज्यस्तरीय टेक्नोव्हिजन स्पर्धेत आर्या जाधव प्रथम

लठ्ठे पॉलिटेक्निकच्या राज्यस्तरीय टेक्नोव्हिजन स्पर्धेत आर्या जाधव प्रथम

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील लठ्ठे पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘टेक्नोव्हिजन’ स्पर्धेत अहमदनगर येथील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकच्या आर्या जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला.

या ऑनलाइन स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नागपूर, नाशिक, अहमदनगर, सिंधुदुर्ग, मुंबई व ठाणे जिल्ह्यांतून २४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये मुंबईच्या भावेश नंदा, प्रवीण पाटील यांनी संयुक्तपणे द्वितीय, मालवणच्या स्वप्नील येरगी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. लठ्ठे पॉलिटेक्निकमधील ऋतुजा यादव, तेजस जगताप, आफ्रिन शेख यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस स्वतंत्रपणे देण्यात आले.

सम्मेद पाटील, दर्शन बिलाना, सिद्धी पाटील, प्रतिभा खोत यांनी संयोजन केले होते. प्रा. माधुरी जाधव यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. प्राचार्य अण्णासाहेब गाजी, उपप्राचार्य राजेंद्र मेंच, शैलेश भिसे यांनी मार्गदर्शन केले. सोसायटीचे अध्यक्ष शांतिनाथ कांते, मानद सचिव सुहास पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Arya Jadhav first in the state level technovision competition of Lathe Polytechnic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.