शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाकडून कृत्रिम पाणीटंचाई, पूर नियंत्रण समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By अशोक डोंबाळे | Updated: June 14, 2023 16:36 IST

कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश मागे घ्या

सांगली : जलसंपदा विभागाने १४ ते १७ जून या कालावधीत कृष्णा नदीतूनपाणी उपसाबंदी आदेश दिला आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये अकारण धास्ती निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी कृत्रिम व मानवनिर्मित पाणीटंचाई निर्माण केली आहे. पिकांचे नुकसान होणार असल्यामुळे आदेश मागे घ्यावा, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले, कोयना धरणामध्ये १२.२४ टीएमसी पाणी शिल्लक आहे. २१०० क्युसेक विसर्ग केला तरीही धरणामध्ये १५ जुलैपर्यंत सात टीएमसी पाणी शिल्लक असणार आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही. जूनच्या अखेरीस मान्सूनचा पाऊस सुरू होतो. कोयना आणि वारणा दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होईल. हवामान विभागानेही मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचे जाहीर केले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होणार आहे. असे असताना जलसंपदा विभागाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करायचा प्रयत्न केला आहे.

यावेळी निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, सतीश रांजणे, संजय कोरे, प्रदीप वायचळ, प्रमोद माने, सुकुमार पाटील आदी उपस्थित होते.कोयनेत पाच टीएमसी असतानाही उपसाबंदी रद्द२४ जुलै १९९२ रोजी अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उपसाबंदी लागू केली होती. तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी कोयना धरणात पाच टीएमसी पाणी होते. राज्यपाल सुब्रमण्यम यांच्या सूचनेनुसार ते पाणी सोडले होते. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. ते पाणी सांगलीत पोहोचण्यापूर्वीच पाऊस सुरू झाला. त्यामुळे आता उपसा बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी सर्जेराव पाटील यांनी केली.साटपेवाडी बंधाऱ्यातून पाणी सोडा

ताकारी योजनेसाठी साटपेवाडी बंधाऱ्यामध्ये १६ फुटापर्यंत पाणी अडवून ठेवले आहे. त्यातील काही पाणी कृष्णा नदीत सोडल्यास सांगलीपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही आणि उपसा बंदीचीही गरज नाही. साटपेवाडीतील पाणी आठ तासात सांगलीत येते. त्यामुळे सध्याची सांगलीतील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होऊ शकेल, असे सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीriverनदीChief Ministerमुख्यमंत्री