शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली लोकसभेचे सैन्य तयार, सेनापती अनिश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:34 IST

कार्यकर्त्यांत संभ्रम; भाजपा, कॉँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ कायम

सांगली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सांगली मतदारसंघात कॉँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षातील सैन्यदल सज्ज झाले असले तरी, सेनापती निश्चित नसल्याने गोंधळ वाढला आहे. गेली महिनाभर बूथ कमिट्यांसह पक्षांतर्गत प्रचाराच्या अनेक नियोजन बैठका झाल्या असल्या तरी, निवडणूक जाहीर होऊनही पक्षीय कार्यालने शांतच आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपा व कॉँगे्रस या दोन्ही पक्षांची अस्तित्वाची लढाई यंदा रंगणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला गत निवडणुकीत भाजपाच्या हल्ल्यात ढासळला असला तरी, कॉँग्रेस हा गड पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करीत आहे. सक्षम उमेदवाराअभावी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. लोकसभेची उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून गेली महिनाभर गोंधळ सुरू असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतरही तो कायम आहे. दुसरीकडे भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांची भाजपाचा उमेदवार म्हणून दावेदारी मजबूत मानली जात असली तरी, पक्षाकडून त्यांच्याही उमेदवारीला अद्याप हिरवा कंदील दर्शविला गेलेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षात वातावरण शांत आहे. सांगलीच्या कॉँग्रेस भवनात तसेच खासदारांचे काका भवन अद्याप शांतच आहे.एकमेकांवर नजराकॉँग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. विरोधी पक्षातील हालचालींचा अंदाज घेऊन रणनीती आखण्याची तयारी करण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपा व कॉँग्रेसच्या नेत्यांनी यासाठी काही कार्यकर्त्यांची नेमणूकही केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSangliसांगलीBJPभाजपाcongressकाँग्रेस