शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: यात्रेच्या वर्गणीवरून वाद, उमराणीत तरुणाचा दगडाने ठेचून खून; संशयितांचे कर्नाटकात पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:51 IST

जत : देवीच्या वर्गणीचे पैसे मागितल्याचा कारणावरून जत तालुक्यातील उमराणी येथे दोघांनी संदीप गणपती बजंत्री (वय २७ वर्षे, रा. ...

जत : देवीच्या वर्गणीचे पैसे मागितल्याचा कारणावरून जत तालुक्यातील उमराणी येथे दोघांनी संदीप गणपती बजंत्री (वय २७ वर्षे, रा. उमराणी, ता. जत) याचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. मात्र या घटनेची नोंद मध्यरात्री जत पोलिस ठाण्यात झाली.याप्रकरणी संशयित विशाल ऊर्फ विश्वनाथ सिद्राया कैकाडी (बजंत्री) व रवींद्र ऊर्फ कुमार सिद्राया कैकाडी (बजंत्री) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जत तालुक्यातील उमराणी येथे कैकाडी गल्लीत समाज मंदिर आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत संदीपचे आजोबा सदाशिव मारुती बजंत्री (वय ७०) यांनी संशयितांना यात्रेतील शिल्लक वर्गणीचा हिशेब मागितला. संशयितांना याचा राग आल्याने त्यांनी सदाशिव यांना शिवीगाळ केली. मृत संदीपने याबाबत संशयितांना जाब विचारला. त्यानंतर संशयित व संदीप यांच्यात बाचाबाची झाली. संशयित रवींद्र याने दगडाने संदीपच्या डोक्यावर हल्ला केला. डोक्याच्या मागील बाजूस जबर मार लागल्याने संदीपचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात आजोबा सदाशिव मारुती बजंत्री यांनी फिर्याद दिली आहे.खुनाच्या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. खून करून दोघे आरोपी कर्नाटकात पळून गेले. त्यांचा जत पोलिस ठाण्यातील दोन पथकाद्वारे शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस