आरग जिल्हा परिषद शाळेची लोकसहभागातून इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:10+5:302021-02-20T05:18:10+5:30

येथील जुन्या ब्रिटिशकालीन शाळेच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झालेली होती. लॉकडाऊन काळात शाळा समितीने लोकवर्गणीतून वर्गखोल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय ...

Arag Zilla Parishad School building with public participation | आरग जिल्हा परिषद शाळेची लोकसहभागातून इमारत

आरग जिल्हा परिषद शाळेची लोकसहभागातून इमारत

येथील जुन्या ब्रिटिशकालीन शाळेच्या इमारतीची अत्यंत दुरवस्था झालेली होती. लॉकडाऊन काळात शाळा समितीने लोकवर्गणीतून वर्गखोल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. एकूण ६० देणगीदारांनी सुमारे पाच लाख रुपयांचा निधी जमा केला. यातून तीन वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले व आकर्षक अशी इमारत तयार झाली. ही जिल्ह्यातील स्वतंत्र मुलींची शाळा व एकूण शाळेचा पट ४२० असणारी ही एकमेव शाळा आहे.

इमारतीचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सरिता कोरबु, सरपंच सुनीता नाईक, उपसरपंच विनोद बुरुड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास मिरजे, मुख्याध्यापक दिलीप मगदूम यांच्याहस्ते करण्यात आले. सरिता कोरबु यांनी शाळेसाठी सुसज्ज सभागृह व वाचनालय उभारण्यासाठी भरीव निधी देण्याचे जाहीर केले. सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. एस. आर. पाटील, उद्योजक तात्यासाहेब खोत यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विजय बोकारे यांनी सूत्रसंचालन केले. योगिता अथणीकर यांनी आभार मानले.

Web Title: Arag Zilla Parishad School building with public participation