सांगली-पेठ रस्त्याचे एप्रिल फुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:51+5:302021-04-11T04:24:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : संपूर्ण देशभरात गाजलेला सांगली ते पेठ रस्ता सध्या कोट्यवधी निधीच्या घोषणांच्या झुल्यावर झुलत आहे. ...

April flower of Sangli-Peth road | सांगली-पेठ रस्त्याचे एप्रिल फुल

सांगली-पेठ रस्त्याचे एप्रिल फुल

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संपूर्ण देशभरात गाजलेला सांगली ते पेठ रस्ता सध्या कोट्यवधी निधीच्या घोषणांच्या झुल्यावर झुलत आहे. केंद्र शासनाकडे प्रस्तावांची कोटीच्या कोटी उड्डाणे होऊनही प्रत्यक्ष वाट्याला आलेल्या निधीच्या एका तुकड्यावर या रस्त्याचा खेळ सुरु आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यावेळी प्रसिद्ध जाहिरातीत मिरज-सांगली-पेठ या रस्त्याच्या कामासाठी १ हजार २०० कोटी जाहीर केले. त्याच सभेत त्यांनी मंजुरीचे पत्रही दिले. या सभेत एकूण ७ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची अधिकृत घोषणा व जाहिरात प्रसिद्ध केली. त्यानंतर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी ३४५ कोटी रुपये या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी केंद्र शासनाने मंजूर केल्याची बाब त्यांच्या कार्यपुस्तिकेत नमूद केली. एप्रिलच्या सुरुवातीला नितीन गडकरी यांनी याच रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी २२ कोटी ६२ लाख रुपयांच्या मंजुरीचे ट्विट केले. आता मागील पॅकेजचे गडकरींना विस्मरण झाले म्हणायचे की, एकूणच या रस्त्याच्या निधीचे एप्रिल फुल म्हणायचे, असा प्रश्न भाबड्या जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

चौकट

रस्त्याची वस्तुस्थिती

एकूण लांबी ४६ किलोमीटर

प्रकार राष्ट्रीय महामार्ग

दररोजचा भार प्रतिदिन ५१ हजार टन

झालेले काम ११ कोटी ५० लाख

नवी मंजुरी २२.६२ कोटी

गडकरींची घोषणा १२०० कोटी व ३४५ कोटी

चौकट

या पॅकेजचे काय झाले

रस्ता रक्कम

कऱ्हाड-तासगाव ३३७ कोटी

तासगाव-शिरढोण १०९ कोटी

नागज-जत-मुचुंडी २४३ कोटी

कऱ्हाड-विटा २८७ कोटी

शिरढोण-कवठेमहांकाळ-जत ४८० कोटी

मिरज शहरातून जाणाऱ्या

राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा १०० कोटी

विटा-तासगाव-काकडवाडी ३१० कोटी

काकडवाडी-मिरज-म्हैसाळ

ते राज्य सीमा २८३ कोटी

मिरज-सांगली-पेठ १२०० कोटी

(ही सर्व राष्ट्रीय महामार्गांतर्गत येणारी कामे आहेत.)

कऱ्हाड

Web Title: April flower of Sangli-Peth road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.