दोनशेवर संस्थांच्या निवडणुकीस मंजुरी
By Admin | Updated: November 12, 2014 23:30 IST2014-11-12T22:45:43+5:302014-11-12T23:30:07+5:30
निवडणूक प्राधिकरण : पाच डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण

दोनशेवर संस्थांच्या निवडणुकीस मंजुरी
सांगली/मिरज : जिल्ह्यातील ‘क’ गटात मोडणाऱ्या २0९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीस निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली असून, येत्या ५ डिसेंबरपर्यंत या निवडणुका पार पाडण्यात येणार आहेत. ‘ड’ गटातील ११४ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियाही आता शेवटच्या टप्प्यात आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत मिरज तालुक्यातील ‘ड’ वर्गातील शंभर सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. ३१ आॅक्टोबर १४ पर्यंत संचालक मंडळाची मुदत संपलेल्या गृहनिर्माण मंडळाची मुदत संपलेल्या गृहनिर्माण मजूर व पाणीपुरवठा संस्थांचा यात समावेश आहे.
तालुक्यात १ हजार ३४६ सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची निवडणूक दर पाच वर्षांनी होणे आवश्यक आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत सहकार कायदा दुरुस्ती, त्यानंतर दुष्काळामुळे सहा महिन्यांसाठी निवडणुका लांबणीवर गेल्या. २०१३ पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास आता प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने या संस्थांची मतदारयादी तयार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू केल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी सांगितले. सहकारी संस्था निवडणुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरणाच्या निर्मितीच्या प्रतीक्षेत तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.
१६८ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. प्राधिकरण अस्तिवात आल्यानंतर प्राधिकरणाच्या मंजुरीने आता सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत आहेत. उपनिबंधकांचे निवडणूक घेण्याचे अधिकार प्राधिकरणाकडे देण्यात आले, मात्र मतदारयाद्या तयार करण्यापासून निवडणूक कार्यक्रम पार पाडण्याचे काम उपनिबंधक कार्यालय व सहकार विभागाच्या कर्मचाऱ्यांकडेच सोपविले आहे. (प्रतिनिधी)
सहकारी संस्थांची चार भागात विभागणी
सहकारी संस्थांचे अ, ब, क, ड असे विभाग करण्यात आले आहेत. राज्य सहकारी संस्था, जिल्हा बँका, साखर कारखाने ‘अ’ गटात, नागरी बँका, विकास सोसायट्या, प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलन असलेल्या दूध संघ, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ व एक कोटी रुपयापेक्षा जास्त भांडवल असलेल्या संस्था ब गटात, दोनशेपेक्षा जास्त सदस्य संस्था असलेल्या विकास संस्था पगारदार संस्था, औद्यागिक संस्था ‘क’ गटात व दोनशेपर्यंत सदस्य असलेल्या गृहनिर्माण मजूर, पाणीपुरवठा संस्थांचा ‘ड’ गटात समावेश आहे. ‘ड’ गटातील छोट्या संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर ‘क’ गटातील संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
निवडणूक पात्र संस्था
गृहनिर्माणमजूरपाणी एकूण
मिरज२०८७३५
कवठेमहांकाळ१३८२४१
जत७५१४२६
तासगाव२२७१३०
पलूस----१०१०
कडेगाव--८--८
आटपाडी२१६७२५
वाळवा१७--११८
शिराळा--१२४२६
एकूण४९११४४६२०९
(दि. १/४/२०१३ ते दि. ३१/१०/२०१४ अखेर पात्र असलेल्या)