शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

इस्लामपूरच्या नेर्लेकर मूकबधिर विद्यालयावर जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:31 IST

इस्लामपूर (ता. वाळवा) येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर शाळेच्या चौकशीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविला होता. त्याआधारे नेर्लेकर मूकबधिर विद्यालयावर

ठळक मुद्देअपंग कल्याण आयुक्तांची कारवाई प्रशासक नियुक्त-

सांगली : इस्लामपूर (ता. वाळवा) येथील डॉ. व्ही. एस. नेर्लेकर मूकबधिर शाळेच्या चौकशीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे कारवाई करण्याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविला होता. त्याआधारे नेर्लेकर मूकबधिर विद्यालयावर अपंग कल्याण आयुक्तांनी समाजकल्याण अधिकाºयांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तसा अहवाल आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे.

नेर्लेकर मूकबधिर विद्यालयाच्या गैरकारभाराबाबत संस्थेतील कर्मचारी जयवंत शामराव जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. याची दखल घेऊन सीईओ राऊत यांनी नेर्लेकर विद्यालयाच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये म्हटले की, नेर्लेकर विद्यालयाचे विशेष शिक्षक अभिमन्यू रानमाळे यांनी विद्यार्थिनींची छेडछाड केली आहे. ते संस्थेच्या वसतिगृहामध्ये बेकायदेशीर निवासासाठी होते. वसतिगृहात राहत असूनही त्यांना घरभाडे भत्ता व वाहन भत्ता दिला जात आहे.

विद्यार्थ्यांकडून घरकाम करून घेतले जात आहे. वर्गामध्ये शैक्षणिक काम व्यवस्थित केले जात नाही, तरीही संस्थेकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. कार्यालयीन कामकाज, रोखेवही लिहिणे, पत्रव्यवहार आदी कामे वर्ग चारचे कर्मचारी दाडमोडे यांच्याकडून करून घेतली जात आहेत. शाळेच्या आर्थिक व्यवहाराबाबत ठेवण्यात येणारी रोखेवही दि. २९ सप्टेंबर २०१८ पासून भरलेली नाही. रोखेवही मुख्याध्यापक प्रमाणित करीत नाहीत आणि प्रतीस्वाक्षरीही करीत नाहीत. या गंभीर त्रुटी चौकशीमध्ये आढळून आल्या आहेत.

या सर्व प्रकरणाची सुनावणी अपंग कल्याण आयुक्त कार्यालयात झाली आहे. या त्रुटीनुसारच नेर्लेकर विद्यालयाचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. प्रशासक म्हणून जि. प. समाजकल्याण अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.विद्यालयातील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यात वाद चालू आहेत. संस्थापकांचे नियंत्रण राहिले नसल्याने प्रशासक नियुक्त केला आहे. त्यानंतर संस्थेच्या सर्वच कारभाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची शिफारसही अपंग कल्याण आयुक्तांनी केली आहे.लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी समितीसंस्थेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार व इतर मुद्द्यांच्या अनुषंगाने विशेष समिती गठित करून सखोल चौकशी करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना केली आहे. या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा सूचनाही अपंग कल्याण आयुक्त नितीन ढगे यांनी दिल्या आहेत.चौकशी समितीने उपस्थित केलेले मुद्देरोखेवहीमध्ये मासिक घोषवारा काढल्याची नोंद नाहीआर्थिक व्यवहार रोखीने केले जातातशाळेच्या साहित्य खरेदीकरिता दरपत्रक न मागविता खरेदीखरेदी केलेल्या साहित्याची जडवस्तू संग्रह नोंदवही नसल्याने शाळेने खरेदी केलेल्या वस्तूंच्या कुठे नोंदीच नाहीतविद्यार्थ्यांना नियमानुसार पोषण आहार दिला जात नाहीविद्यार्थ्यांना पुरेसा व सकस आहार दिला जात नाहीविद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती नाहीशाळेतील पदे संस्थेने बिंदुनामावलीनुसार भरलेली नाहीतविद्यार्थ्यांच्या निवासाच्या ठिकाणी पुरेशा खिडक्या, पंखे व प्रकाशाची व्यवस्था नाहीसीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत

टॅग्स :Sangliसांगलीsexual harassmentलैंगिक छळ