बेडगच्या श्रीधर लिंबिकाई याची आयकर सहायक आयुक्तपदी नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST2021-07-07T04:32:10+5:302021-07-07T04:32:10+5:30
डॉ. श्रीधर लिंबिकाई यांनी बेडगच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, न्यू इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतले. श्रीधर यांचे वडील ...

बेडगच्या श्रीधर लिंबिकाई याची आयकर सहायक आयुक्तपदी नियुक्ती
डॉ. श्रीधर लिंबिकाई यांनी बेडगच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, न्यू इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतले. श्रीधर यांचे वडील मिरजेत जीवन प्राधिकरण विभागात पंप ऑपरेटर होते. मुलाने डॉक्टर व्हावे, अशी वडिलांची इच्छा असल्याने श्रीधर यांनी बारावीनंतर वैद्यकीय प्रवेश परीक्षा देऊन नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालयात प्रवेश घेतला. वडिलांच्या इच्छेखातर डॉक्टर झालेल्या श्रीधर यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचे असल्याने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. पुणे व दिल्ली येथील अकॅडमीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेतून त्यांची आयकर सहायक आयुक्तपदी निवड झाली. जीवनात ध्येय प्राप्तीसाठी स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडले पाहिजे, असे डाॅ. श्रीधर लिंबिकाई यांनी यावेळी सांगितले.
यावेळी तानाजी ओमासे, रावसाहेब लिंबिकाई, धनचंद्र सगळे, जीवनधर लिंबिकाई उपस्थित होते.
फाेटाे : ०५ मिरज ३
मिरज येथे आयकर सहाय्यक आयुक्तपदी निवडीबद्दल श्रीधर लिंबिकाई यांचा डॉ. रवींद्र फडके यांनी सत्कार केला. यावेळी तानाजी ओमासे, रावसाहेब लिंबिकाई, धनचंद्र सकळे, जीवनधर लिंबिकाई उपस्थित हाेते.