सांगली : जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि आटपाडी, शिराळा नगरपंचायतींमधील नगरसेवकपदाच्या १८१ जागांसाठी एक हजार ६७८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.यापैकी मंगळवारी छाननीमध्ये ४८१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. तसेच नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ११० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ३७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. या छाननीमध्ये दिग्गज इच्छुकांचे अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांना निवडणुकीपासून बाजूला थांबवे लागणार आहे.आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेता येणारनगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना बुधवार, १९ ते २१ या काळात उमेदवारी मागे घेण्याची मुदत राहील, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. दि. २१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमदेवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.छाननीत अवैध झालेले अर्जनगरपालिका / सदस्यांचे अवैध अर्ज / नगराध्यक्षपदाचे अवैध अर्ज
- उरुण-ईश्वरपूर / ८६ /४
- विटा /९९/०८
- आष्टा /२४/०१
- जत /३१/०२
- पलूस /७४/०३
- शिराळा /६७/०३
- आटपाडी /४२/१०
- तासगाव /५८/०७
Web Summary : During scrutiny for Sangli district's local body elections, 518 applications were invalidated. Candidates can withdraw applications from 19th to 21st. The final electoral picture will be clear after withdrawal deadline.
Web Summary : सांगली जिले के स्थानीय निकाय चुनावों की जाँच में 518 आवेदन अवैध पाए गए। उम्मीदवार 19 से 21 तारीख तक आवेदन वापस ले सकते हैं। नाम वापसी की अंतिम तिथि के बाद चुनाव की तस्वीर स्पष्ट होगी।