अंत्री बुद्रुकला झाड अंगावर पडून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:38+5:302020-12-08T04:24:38+5:30

शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथील शेताच्या बांधावरील लिंबाचे झाड तोडत असताना ते अंगावर पडून काका चंद्रू ...

Antri Budrukala fell on a tree and killed one | अंत्री बुद्रुकला झाड अंगावर पडून एक ठार

अंत्री बुद्रुकला झाड अंगावर पडून एक ठार

शिराळा : अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथील शेताच्या बांधावरील लिंबाचे झाड तोडत असताना ते अंगावर पडून काका चंद्रू आढाव (वय ५८) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शेतकरी भानुदास बापू पाटील यांच्याविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्यादरम्यान घडली.

भानुदास पाटील यांच्या शेतात बांधावरील लिंबाचे झाड काका आढाव तोडत होते. यावेळी ते झाड आढाव यांच्याच आगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंगावर पडलेले झाड जेसिबीने बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आला. झाड तोडताना शेतकरी भानुदास पाटील यांनी योग्य खबरदारी न घेतल्याने काका आढाव यांचा मृत्यू झाला असल्याचे विजय आढाव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन भानुदास पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मृत काका आढाव यांच्या पश्चात अंध पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Antri Budrukala fell on a tree and killed one