जतमध्ये सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटिजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:35+5:302021-05-09T04:26:35+5:30

शेगाव : जत शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाणे व नगरसेवक टीमू एडके, आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून ...

Antigen test for morning walkers in Jat | जतमध्ये सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटिजन चाचणी

जतमध्ये सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटिजन चाचणी

शेगाव : जत शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाणे व नगरसेवक टीमू एडके, आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्यात आली. एकूण ३० नागरिकांपैकी एक नागरिक कोरोनाबाधित आढळला.

अँटिजन चाचणी होईल या भीतीने यावेळी काही नागरिकांनी धूम ठोकली.

जत शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी जत नगर परिषदेने दहा दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला. पोलिसांनी आवाहन करूनही नागरिकांची सकाळी मोठ्या प्रमाणात फिरायला गर्दी सुरूच होती. कोरोनाची रुग्ण संख्येत घट व्हावी यासाठी शुक्रवारी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली व जतचे प्रभारी पोलीस निरीक्षक गोपाल भोसले, नगरसेवक टीमू एडके यांच्या यांनी सकाळी फिरायला जाणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत पोलीस नाईक सचिन जौंजाळ, अमोल चव्हाण, चालक राजू पवार, आरोग्य विभागाचे विश्वास लवटे, गोपाल कोळी आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Antigen test for morning walkers in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.